पंजाबी की मराठी इन्स्पेक्टर, सलमानपुढे पडला प्रश्न

Salman Khan - Mahesh Manjrekar

सलमान खान (Salman Khan) आता लवकरच अंतिम नावाच्या चित्रपटाला शूटिंग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा (Ayush Sharma) नायकाची भूमिका साकारणार आहे. सलमान आणि आयुषचा हा चित्रपट मराठीतील सुपरहिट चित्रपट मुळशी पॅटर्नची हिंदी रिमेक आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात आयुष शर्मा एका गँगस्टरची भूमिका साकारणार असून सलमान खान इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. मात्र हा इन्स्पेक्टर मराठी असावा की शीख असावा अशा द्विधा मनस्थितीत सलमान खान आहे.

मुळशी पॅटर्न मराठी मातीतला चित्रपट असला तरी त्याची रिमेक करताना कथानक पंजाबमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे अगोदर या चित्रपटाचे नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ” ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते बदलून ‘अंतिम’ असे करण्यात आले. पंजाबची कथा असल्याने इन्स्पेक्टर पंजाबी दाखवावा असे सलमान खानला वाटते. दिग्दर्शक महेश मांजरेकर मात्र मूळ मुळशी पॅटर्नमध्ये मराठी इन्स्पेक्टर असल्याने सलमान खानने मराठी इन्स्पेक्टर साकारावा असा आग्रह धरीत आहे.

15 नोव्हेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. मात्र सलमानने कोणत्या इन्स्पेक्टरची भूमिका करावी यावर अजून निर्णय झालेला नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सलमान खानने पुढील आठवड्यात पंजाबी आणि मराठी अशा दोन्ही प्रकारच्या इन्स्पेक्टरचा लुक टेस्ट करणार आहे. त्यानंतर जो लुक आवडेल ती भूमिका तो करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER