पंजाब : मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याविरुद्ध सिद्धूची हायकमांकडे तक्रार

Amarinder Singh - Navjot Singh Sidhu

नवी दिल्ली : सध्या पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हायकमांडने सर्व आमदार, मंत्री आणि राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलवले आहे. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी दिल्लीत हायकमांडकडून गठित करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली.

या बैठकीनंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले की, हायकमांडने बोलावल्यानंतर मी आलो आहे, पंजाबमधील जनतेचा आवाज पोहचवण्यासाठी आलो आहे. मी पंजाबचे सत्य आणि हक्काचा आवाज हायकमांडला सांगितला आहे. माझी भूमिका अशी आहे की, पंजाबमधील लोकांमध्ये लोकशाही ताकद आहे, त्यांना ती मिळायला हवी. सत्य काय आहे, ते मी संपूर्णपणे सांगून आलो आहे. सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही, आम्हाला पंजाबला जिंकायचे आहे.

आज (मंगळवारी) पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील तीन सदस्यीय पॅनलसमोर त्यांच्या समस्या मांडत आहेत. काँग्रेसचे किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजित चन्नी, सुखजिंदरसिंग रंधावा यांचा समावेश आहे. सर्व दिल्लीत दाखल झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करून पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button