पंजाब-हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांवर बहिष्कार

Justice Ravi Shankar Jha - Punjab and Haryana High Court Chandigarh

चंदिगढ : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील (Punjab and Haryana High Court Chandigarh) वकील संघटनेने त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्य. रवी शंकर झा (Ravi Shankar Jha) यांच्या बदलीची मागणी केली असून जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत त्यांच्या न्यायालयावर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे.

‘पंजाब अ‍ॅण्ड हरियाना हायकोर्ट बार असोसिएशन’च्या कार्यकारिणीने शुक्रवारी संध्याकाळी अशा आशयाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही संघटनेचा सदस्य असलेला किंवा नसलेला वकील मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात प्रकरण चालविण्यासाठी ‘व्हर्चुअल’ सुनावणीत जरी उभा रिहाला तर संबंधित पबार कौन्सिलकडून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करविली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

वारंवार मागणी करूनही उच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष सुनावणीचे काम सुरु न केल्याच्या निषेधार्थ संघटनेने असाच निर्णय १ फेब्रुवारी रोजी सुद्धा घेतला होता. आताच्या निर्णयाने तो जुना निर्णय पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.

आताच्या बहिष्काराचे कारण देताना संघटनेने न्यायालयाकडून केल्या जाणाºया कथित पक्षपाताचे कारण दिले आहे. संघटना म्हणते की, नेहमीच्या ४६ न्यायालयांऐवजी सध्या फक्त ११ न्यायालये सुरु आहेत. त्यांच्यापुढे सुनावणी घेतानाही मनमानी पद्धतीने प्रकरणे निवडली जातात. दोन्ही राज्यांमधील जनतेला उच्च न्यायालय तत्परतेने न्याय मिळण्यापासून वंचित ठेवत आहे, असा संघटनेचा आरोप आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button