रोमांचक सामन्यात हैदराबादवर पंजाबने १२ धावांनी विजय मिळवला

Punjab beat Hyderabad by 12 runs in an exciting match

इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) मध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) आपल्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. हा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने १९.५ षटकांत सर्वबाद ११४ धावा केल्या.

या सामन्यात निकोलास पूरनने पंजाब संघासाठी सर्वाधिक ३२ धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या सामन्यासाठी पंजाब संघाने दोन बदल केले आहेत, तर मयंक अग्रवाल आणि जिमी नीशामच्या जागी मनदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनचा समावेश केला. याशिवाय डेव्हिड वॉर्नरनेही शाहिल नदीमच्या जागी खलील अहमदला संघात घेतले.

दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे आणि दोघांनीही समान सामने खेळले आहेत. आतापर्यंत ११ सामने खेळल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये पंजाब १० गुणांसह पाचव्या स्थानी तर हैदराबाद ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी या दोन्ही संघांना उर्वरित सामने जिंकणे गरजेचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER