पंजाबने दिल्लीवर पाच गडी राखून मिळवला विजय

Punjab beat Delhi by five wickets

मंगळवारी दुबईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ३८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पाच गडी गमावून १६४ धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने नाबाद १०६ धावांची खेळी केली. धवन वगळता इतर कोणताही फलंदाज १५ धावांच्या आकड्याला स्पर्श करू शकला नाही. पंजाबकडून मोहम्मद शमीने दोन, ग्लेन मॅक्सवेल, मुरुगन अश्विन आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दिल्लीचा संघ दहापैकी सात सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे आणि केवळ तीन सामन्यात पराभूत झाला आहे. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांच्या १० पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळविला आणि ६ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे, दिल्ली १४ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये प्रथम तर किंग्ज इलेव्हन पंजाब ८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER