राजकीय हेतू न केल्याची शिक्षा देण्याचे काम सुरू आहे; अनिल देशमुखांचा आरोप

Anil Deshmukh - Maharastra Today

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. ईडीने तपास सुरू केल्याचा मला माध्यमातून माहिती मिळत आहे, असे देशमुख म्हणाले. यापूर्वी CBIच्या माध्यमातून चौकशी झाली. आता EDच्या माध्यमातून होणार. मी राजकीय हेतू न केल्याच्या गुन्ह्यास शिक्षा देण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

ECIR म्हणजे काय?

ईडीने तपास सुरू करण्यापूर्वी नोंदवलेले पहिले अधिकृत दस्तऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट, जो ECIR म्हणून ओळखला जातो. एखाद्या गुन्ह्यात चौकशी सुरू करण्यापूर्वी जसे पोलीस प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवतात. त्याचप्रकारे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची माहिती मिळताच ईडी ECIR नोंदवते. यामुळे अनिल देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी सुरू होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान, सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल :  राष्ट्रवादीची प्रतिक्रिया 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button