सांगा कसे जगायचे ? पुण्यात पुराच्या पाहणीदरम्यान खासदार सुप्रिया सुळेंसमोर ढसाढसा रडली महिला

Supriya Sule

मुंबई : मुसळधार पावसाने पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, रस्ते जलमय झाले तर गाड्या वाहून गेल्या. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान झालं. पुण्यातील ही पूरस्थिती पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या त्यावेळी महिला आणि नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्यांचा फाडाच वाचला .

सांगा गरिबांनी कसं जगायचं? दोन वर्षांत अनेक संकटं आली. लहान मुलं आहेत सोबतीला. काही ना काही अडचणी येत आहेतच. याची जबाबदारी कोण घेणार? भिंत कोसळल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. असं म्हणत ही महिला जोरजोरात रडू लागली. या महिलेला खासदार सुप्रिया सुळे यांना धीर दिला आणि महापालिका आणि आयुक्तांशी बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिले आहे . दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पुणे अजित पवार यांनी पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER