मराठा आरक्षक्षणावरून शरद पवारांनी पार्थला फटकारले

Maratha reservation-,Sharad Pawar-Parth Pawar

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते.

यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा पार्थ यांचे नाव न घेतला फटकारले आहे. या प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी पार्थला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले आहे . खरेच्या प्रश्नावर आज पुण्यात बैठक झाली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी खडेबोल सुनावले . स्थगिती उठावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवणे हे गरजेचं आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. आत्महत्या करणं योग्य नाह, असे आवाहन पवारांनी तरुणांना केले आहे . मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण नको, असेही ते म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER