राष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला पाणीचोर ; निवृत्त पोलिसाच्या शेतातून चोरायचा पाणी

Mangaldas Bandal

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पक्षातून हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) याच्यावर सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात येत अस आरोप आहे .

माहितीनुसार , आरोपी मंगलदास बांदल आणि त्याच्या भावाविरोधात सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बांदल भावंडं तनपुरेंच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button