… आता राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नाही : राजू शेट्टी

Raju Shetty & Sharad Pawar

मुबई : विधान परिषदेच्या जागेसंदर्भात माझी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली होती. राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभीमानीला देण्याचं ठरलं होतं. पण तीन महिन्यानंतर काय झाले मला माहिती नाही. आता राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संगीतले .

दरम्यान महायुतीतून बाहेर पडल्या नंतर आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी आघाडीच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळाले . १६ जून रोजी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शेट्टी आणि पवार यांच्यात अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. याच बैठकीत राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात होते . पण आता शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे ते म्हणाले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER