पुण्यात सर्वत्र पोस्टरचीच चर्चा! ‘व्हॅलेंटाईन डे’नंतर मागितली पत्नीची माफी

Pune News

पुणे : पुणे हे एरवी ‘पाटय़ांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. विविध पद्धतीच्या आणि नमुनेदार पाटय़ांमुळे पुणे कायम चर्चेत असते. आता मात्र, पोस्टरमुळे पुणे चर्चेत आले आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेम दिन १४ फेब्रुवारीला साजरा झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारीला पुण्यातील हडपसर परिसरात लागलेले पोस्टर चर्चेचा विषय झाले आहे.

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तिची क्षमायाचना एकाचवेळी या पोस्टरमध्ये दिसून येत आहे! ‘हॅप्पी मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी, १५ फेब. आय लव्ह यू, सॉरी अपू’, असे या फ्लेक्स पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

तीन-चार दिवसांपूर्वीच सविताभाभीविषयक पोस्टरमुळे पुणेकर भांबावून गेले होते. आता, पत्नीची माफी मागणारे हे पोस्टर एका डॉक्टरने लावल्याची चर्चा आहे. सदर दाम्पत्य व्यवसायाने डॉक्टर असून, न्यायालयात त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरू असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले असून, पुणेकरांच्या जोरदार कॉमेंट्स येत आहेत.