
मुंबई : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले .
भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पणानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यानंतर अचानक कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चांगलेच भिडले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला