पुणे महापालिका सीरमची लस खरेदी करणार, १० लाख डोसची मागणी; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Murlidhar Mohol

पुणे : सध्या भारतात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्र सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. पुणे शहराचा देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश आहे. पुणे महापालिका कोविशिल्ड लसींची (Covishield) थेट खरेदी करणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली.

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) थेट लस खरेदी करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांच्याकडे १० लाख डोसची मागणी केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पूनावालांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. भारत सरकारकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या लसीची खरेदी करण्यात येत आहे. २० मेपर्यंत सीरमचा पुरवठा केंद्राला होणार आहे.

राज्य सरकारनेही सीरमला लसीबाबत पत्र लिहिले आहे. त्यामुळे आदर पूनावाला पुणे महापालिकेला लस देणार का? हा प्रश्न आहे. पुण्यात लसीचे उत्पादन होत असल्याने महापालिकेला लसीचे डोस मिळण्याची आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button