पुणे महापालिका कडक लॉकडाऊनसाठी सज्ज; १६ दिवसांत दुप्पट बेड्स वाढवले

Pune Municipal Corporation - Hospital Beds

पुणे : पुण्यात कोरोनाच्या (Corona) उद्रेकामुळे परिस्थिती गंभीर आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. मात्र, संपूर्ण यंत्रणा परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत आहे, आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत, अशी  माहिती मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णांची संख्या वाढल्याने बेड्सची गरज वाढली. त्यामुळे आवश्यकतेनुसार वाढ करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट कधी आणि कशी सुरू झाली, याचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. गेल्या दोन दिवसांत पुण्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न निर्माण झाला होता. विक्रम कुमार यांनी सांगितले की, पुण्यात एकूण ५५० व्हेंटिलेटर बेड्सपैकी २ शिल्लक होते. मात्र, आर्मीकडून २० व्हेंटिलेटर बेड्स  आणि २० आयसीयू बेड्स  मिळणार आहेत. पुढील चार दिवसांत ५० व्हेंटिलेटर बेड्स  वाढवणार. ऑक्सिजन बेड्सचा विचार करता ४०० ऑक्सिजन बेड्स  शिल्लक आहेत. यात आणखी ३५० ऑक्सिजन बेड्स वाढवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button