पुणे महापलोकेचे ८ हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर

Pune Municipal Corporation

पुणे : पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) सन २०२१-२२ चे तब्बल ८ हजार ३८० कोटींचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीने मुख्यसभेला सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक भर देण्यात आला असून पीपीपी मॉडेलद्वारे रस्ते विकसीत करणे, डीपी रस्त्यांचे विकसन करण्यासोबतच उत्पन्न वाढीवर भर देण्यात आल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला आहे. दरम्यान यंदाचे अंदाजपत्रक गतवर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा एक हजार कोटींने जास्त आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सोमवारी महापालिकेच्या ऑनलाईन मुख्यसभेला सादर केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रुबल अग्रवाल, सुरेश जगताप आदी उपस्थित होते.

अंदाजपत्रकामध्ये प्रभावी महसूल वाढ करण्यावर भर देण्यात आला असून त्याकरिता मिळकतकराची साडेचार हजार कोटींची थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात येणार आहे. कराच्या कक्षेत न आलेल्या मिळकती शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणले जाणार असून मिळकत कर आकारणीतील गळती थांबविण्यात येणार असल्याचे ही हेमंत रासने यांनी म्हटले. यासोबतच पाणीपट्टीची थकबाकीही वसुल केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा : गॅस सिलेंडरच्या दरात आणखी २५ रुपयांची वाढ, नवे दर ८१९ रुपये

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला ७ हजार ६४९ कोरटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने तब्बल ७२० कोटी रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी (सन २०२०-२१) ७ हजार ३९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. नियमित कर भरणा-या नागरिकांना मिळकतकरा १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. पालिका प्रशासनाने २०२१-२२ च्या अंदाजपत्रकामध्ये गृहीत धरलेल्या उत्पन्नामध्ये स्थायी समितीने भरसाठ वाढ केली आहे. पालिकेच्या उत्पन्नाच्या इतर पयार्यामधून प्रशासनाने ८५४ कोटी उत्पन्न अपेक्षित धरले होते. यामध्ये स्थायी समितीने ५० कोटींची वाढ केली आहे. तर, बांधकाम शुल्कामध्ये २०० कोटींनी वाढ करण्यात आली आहे. मिळकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची वाढ गृहित धरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER