मनसे नगरसेवकाचा राडा ; रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

पुणे : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाचा संताप पाहायला मिळाला. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली. पुण्यातील मनसेच्या (MNS) नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनीही हा व्हिडीओ शेअर (Video Share) करत पालिकेवर संताप व्यक्त केला आहे.

रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या
असल्याचे मोरे म्हणाले .

रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?” असा सवाल विचारात नियोजन न केल्यास एकाही अधिकाऱ्याला गाडीने फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी पुणे महापालिकेला दिला.

आम्ही माणूस आहोत, कोरोना भयाण परिस्थितीत माणसांना जगवा. उपाययोजना द्या रे बाबांनो, हात जोडून खूप वेळा सांगितले. लोकप्रतिनिधी असून न्याय देऊ शकत नसू, तर आम्ही नालायक असू” अशा शब्दात मोरे यांनी आपला राग व्यक्त केला .

ही बातमी पण वाचा : राज साहेबांनी दिलेली मुदत संपली, मनसैनिकांकडून मंदिराचे टाळे तोडूत महाआरती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER