अजित पवारांच्या ‘त्या’ आवाहनाला राज ठाकरेंचा प्रतिसाद ; रद्द केली पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक

Raj Thackeray AND Ajit Pawar

पुणे :- पुण्यात कोरोनाचे (Pune Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हे पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचे  आयोजन केले होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याचसंदर्भातील माहिती पुण्यातील मनसे (MNS) नेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा पाहता पालकमंत्री अजित पवार यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आवाहन केले की, शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात यावीत तसेच गर्दी टाळावी. पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एवढ्या लोकांना एकत्रित बोलवून पत्रं देणं योग्य दिसणार नाही.

प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत किमान एक व्यक्ती जरी आला तरी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला येणाऱ्यांची संख्या शंभर ते दीडशे होईल. त्यामुळे आजच्या गाठीभेटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं वागस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष उपस्थित असतील असं वागस्कर यांनी सांगितलं आहे.

नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे सकाळी मुंबईहून निघाले आणि ते पुण्यात पोहचले. पुण्यामध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ४५ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप आणि आजी-माजी नगरसेवकांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विभागीय आयुक्त आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आवाहन केलं आहे शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात यावीत तसेच गर्दी टाळावी. पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एवढ्या लोकांना एकत्रित बोलवून पत्रं देणं योग्य दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळले गेले पाहिजेत. म्हणूनच या भेटीगाठींचं नियोजन रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती वागस्कर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER