पुणे- मुंबईप्रमाणेच नागपूरातील खाजगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दया; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

dayashankar tiwari - uddhav thackeray - Maharastra Today

नागपूर : नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांना अनुमति दिल्यावर नियंत्रण आणण्यास मदत होईल, यामुळे पुणे आणि मुंबईप्रमाणेच नागपूर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केन्द्र सुरू करण्याची परवानगी दयावी, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्राव्दारे केली आहे.

पुणे-मुंबई शहरामध्ये लसीकरणासाठी योग्य व्यवस्था, लस साठवण्याकरीता कोल्ड चेन स्पेस, लसीकरणासाठी प्रशिक्षित चमू आणि १०० खाटांचे रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. अश्याचप्रकारे नागपूरातील रुग्णालयांना परवानगी दिली, तर जास्तीत-जास्त लसीकरण करणे शक्य होईल. नागपूर मनपाचे आयुक्त यांनी ४ मार्च ला पत्राव्दारे खाजगी रुग्णालयांना अनुमती देण्याची विनंती केली होती. याबाबत आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले, असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.

केन्द्र शासनाचे निर्देशाप्रमाणे १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्यात येईल. महापौरांनी केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाकडे याबाबत चर्चा केली आहे. तिवारी यांनी सांगितले की, शासनाकडून नागपूर महानगरपालिकेचा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. आम्ही नागपूरसाठी काही वेगळी मागणी करत नाही. फक्त जे मुंबई आणि पुण्याला दिले तशीच परवानगी नागपूरमध्येही देण्यात यावी. याबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेऊन नागपूरकरांना दिलासा देतील, अशी अपेक्षा दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER