कार्यक्रमात होणारी गर्दी ठरतेय चिंताजनक; कोरोना रुग्णात वाढ

पिंपरी : कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने काही नियम लागू केले आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाचे आकडे शंभरच्या खाली होते. मात्र आता कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. पूर्वीप्रमाणे नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषत: वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी चिंताजनक आहे. हॉटेलात, सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिग, मास्क आदींबाबत बेफिकिरी दाखवतात.

कोरोनामुळे सरकारने साथरोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. यानुसार काही नियम तयार केले आहेत. जास्त गर्दीमुळे साथीचे रोग अधिक वेगाने पसरत आहे. ५० पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यासही सरकारने मनाई करण्याचे आदेश प्रशासनांना दिले आहेत. कोरोनामुळे सुमारे ७ महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यात हॉटेल, रिसॉर्ट आदींचे नुकसान झाले. व्यवसाय सावरण्यासाठी त्यांनी सभागृहांचे भाडे आणि जेवणाच्या थाळीमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत.

यावेळी महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षातील आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात आंदोलनाचे प्रमाण वाढले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या गर्दीवरील पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने यात जास्त लोक दिसून येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER