पुण्याजवळ गडावरून कोसळल्याने ट्रॅकिंग करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

Pune hadpsar-fort-mumbai-Girl-dies-after-falling

पुणे : एकीकडे शिवजयंती सगळीकडे उत्साहात साजरी होत होती तर नियती एका २० वर्षीय तरूणीशी काही वेगळाच खेळ खेळत होती. तीला हे ठाऊकच नव्हते की तीची ही शेवटची शिवजयंती असेल. जुन्नर परिसरातील हडसर किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त दुर्ग स्वच्छता मोहिमेसाठी मुंबईतील एका गटाबरोबर आलेल्या युवतीचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्धी सुनील कामठे (वय २०, सध्या रा. चिंचपोकळी, मुंबई, मूळ रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.

जुन्नरहून तेरा किलोमीटर अंतरावर हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. या मोहिमेत गिर्यारोहण संस्थेतील ३५ सदस्य सहभागी झाले होते.

गिर्यारोहकांच्या गटात सिद्धी होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गिर्यारोहकांचा गट अवघड अशा पायवाटेवरून किल्ल्यावर जात होता. अनेक ट्रेकचा अनुभव असलेली सिध्दी लिड करत होती. त्यावेळी गवतावरून सिद्धीचा पाय घसरला आणि काही कळण्याच्या आत ती दरीत पडली.

या दुर्घटनेनंतर जुन्नर पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी सिध्दीला अंबुलन्समधुन जुन्नर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.

चंद्रपुरात अपघात : देवदर्शनाहून येणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू