फलंदाज सर्वाधिक आणि धावाही सर्वाधिक पुण्यातला शेवटचा सामना ठरला खास

India VS England

भारत आणि इंग्लंडदरम्यानची (India Vs England) मालिका संपली असली आणि त्यात भारतीय संघाने विजयाची हॕट्ट्रीक (Hattrick) साधली असली तरी या मालिकेतील सामन्यांचे बरेच नवनवीन विक्रम समोर येत आहेत. असाच एक विश्वविक्रम भारताने फक्त 7 धावांनी जिंकलेल्या वन डे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात घडला आहे. तो म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांच्या सर्वच्या सर्व म्हणजे 22 खेळाडूंनी फलंदाजी(Most Batsmen) केली आणि सामन्यात 651 धावा (Most Runs) निघाल्या. भारताने 329 धावा केल्या तर इंग्लंडने 9 बाद 322 धावा केल्या.

याप्रकारे दोन्ही संघांच्या सर्व 22 खेळाडूंनी फलंदाजी करताना सर्वाधिक धावा निघाल्याचा विक्रम या सामन्यात घडला. याआधीचा विक्रम अफगणिस्तान व आयर्लंड दरम्यानच्या 2017 मधील सामन्याच्या 642 धावांचा होता. सर्व 22 खेळाडूंनी फलंदाजी करुन वन डे सामन्यात 600 च्या वर धावा निघालेले हे दोनच सामने आहेत.

22 खेळाडूंची फलंदाजी व सर्वाधिक धावा

651- भारत वि. इंग्लंड- पूणे- 2021
642- अफगणिस्तान वि. आयर्लंड – ग्रेटर नोएडा- 2017
573- आॕस्ट्रेलिया वि. पाकिस्तान- टाँटन- 2019
570- भारत वि. आॕस्ट्रेलिया- बंगलोर- 2001
558- आॕस्ट्रेलिया वि. भारत- मेलबोर्न- 2004

याच सामन्यातील 651 धावांसह आणखी एक विश्वविक्रम फक्त पाच धावांनी सुरक्षित राहिला. तो म्हणजे वन डे सामन्यात कोणत्याही फलंदाजाच्या शतकाशिवाय या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा ठरल्या.

शतकाशिवाय सर्वाधिक धावांचे वन डे इंटरनॅशनल सामने असे…

656- द. आफ्रिका (326) वि. आॕस्ट्रेलिया (330)- पोर्ट एलिझाबेथ- 2002
651- भारत (329) वि. इंग्लंड (322)- पूणे- 2021
649- भारत (329). वि. इंग्लंड (320)- ब्रिस्टाॕल- 2007
648- इंग्लंड (351) वि. पाकिस्तान (297)- लीडस्- 2019

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button