पुणे पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीत बंडखोरी सुरूच, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

Arun Lad

मुंबई : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड (Arun Lad) यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, राष्ट्रवादीला (NCP) बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. कारण, राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने (Pratap Mane) यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून (BJP) संग्रामसिंह देशमुख (Sangram Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक – क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत .

मागील पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणाऱ्या अरुण अण्णा लाड यांना तब्बल 48 हजार इतकी मत पडली होती. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार श्रीरंग पाटील यांना पन्नास हजाराच्या आसपास मत पडली होती. तर भाजपचे विजयी उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना 52 हजाराच्या आसपास मते पडली होती. अरुण लाड यांच्या त्या वेळच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी’च्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

या मतदारसंघात अरुण अण्णा लाड यांनी यावेळी सुद्धा जोरदार तयारी केली आहे. यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी परिस्थिती असताना. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव याच मतदारसंघातील भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून अगोदरच उमेदवारी जाहीर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER