पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉरंटाईन सेंटरची भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी

Chandrakant Patil

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील कॉरंटाईन सेंटरची भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी केली. यावेळी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींच्या देखभालीसाठी तैनात वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

पुण्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संशयित रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या केंद्राला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला.

सध्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी कर्मचारी सर्वस्व अर्पण करून काम करत असल्याने सर्वांचे आभार मानले. तसेच, डॉक्टर आणि सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यक्तिश: आभार मानले. तसेच पोलिसांनाही धन्यवाद दिले.

यावेळी श्री. पाटील यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे आणि महापालिका उपायुक्त डॉ. राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.