एकनाथ खडसेंसोबत पुण्याचे गोल्डमॅनही राष्ट्रवादीत प्रवेश करणार

prashant sapkal

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचा (BJP) राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाण्याचा निर्णय घेतला . आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे . यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुवात झाली .

पुण्याचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ (Prashant Sapkal) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंसोबत गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.प्रशांत सपकाळ हे पुण्याचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन आहेत. प्रशांत सपकाळ हे तब्बल पाच किलो म्हणजेच दीड कोटीपेक्षा जास्त सोने अंगावर घालतात. त्यामुळे पुण्यातील नवा गोल्डमॅन म्हणून प्रशांत यांची हवा झाली.

प्रशांत सपकाळ यांच्याकडे चेन, ब्रेसलेट, घड्याळ एव्हढंच नाही तर सोन्याची चप्पल आणि सोन्याचा बूटही आहे.प्रशांत सपकाळ यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली. त्यातूनच पुण्यात नवा गोल्डमॅन उदयाला आला.प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर आहेत. बांधकाम व्यवसायातूनच आपली भरभराट झाल्याचं ते सांगतात.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंबाबत शरद पवारच निर्णय घेतील! छगन भुजबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER