रुग्णाला मृत घोषित केले ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या समर्थकांचा हॉस्पिटलमध्ये राडा

Maharashtra Today

मुंबई :- एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे तर दुसरीकडे संतप्त नातेवाईकडून डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडतांना दिसत आहे. एका रुग्णालयाच्या हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच (Cardiac Ambulances) रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण (doctor) करुन हॉस्पिटलमध्ये राडा घातल्याची माहिती समोर आली आहे .

माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळवले.

डॉ. राहुल पाटील (Dr. Rahul Patil) यांनी रुग्णाला तपासले. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबद्दल त्यांनी तेथे जमलेल्या 15 ते 20 जणांना सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाइपने मारहाण केली.

तसंच, हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. एवढंच नाहीतर सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडून नुकसान केले.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः नगरसवेक तिथं असून ही तोडफोड झाली याबाबत डॉ. सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button