आदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’

12-Year-Old Boy Creates Unique Box To Sterilize Groceries, Essentials

पुणे : येथील १२ वर्षांच्या आदित्य पाचपांडे या मुलाने किराणा, भाजीपाला – फळे निर्जंतुक करण्यासाठी ‘सुरक्षा बॉक्स’ तयार केला आहे. यात अल्ट्राव्हालट (अतिनील) किरणांनी निर्जंतुकीकरण होते. आदित्यने हे सुरक्षा बॉक्स दादरच्या भाजी आणि फळ बाजारात फळ विक्रेत्यांना भाजी – फळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिले आहेत.

कोरोनाच्या (Coronavirus) साथीच्या काळात लोक भाज्या- फळे व किरणांचे पुडे निर्जंतुक करण्यासाठी सोडा, साबण, सॅनिटायजर वापरतात. सामान उन्हात ठेवतात. पण यातून फारसे साध्य होत नाही उलट बरेचवेळा नुकसान होते, असे तो म्हणतो.

आदित्य म्हणतो की निर्जंतुकिरणासाठी सूर्यप्रकाश सर्वोत्तम आहे. सूर्यप्रकाशाने जन्तू मरतात. सूर्यप्रकाशातही अतिनील किरणे असतात. यातूनच प्रेरणा घेऊन मी सुरक्षा बॉक्सची निमिर्ती केली. यात २४० एनएम फ्रिक्वेन्सीच्या दिव्याने वस्तूंचे निर्जंतुकीकरण होते.

आदित्य असे १५ हजार १०० सुरक्षा बॉक्स गरजू, मागास व शाळांना दान देणार आहे. त्याने आवाहन केले आहे की कोरोनाच्या साथीच्या काळात हे बॉक्स दिवाळीत मित्र – नातेवाईकांना भेट द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER