पुलवामा हल्ल्याबद्दल नाही, त्यानंतरच्या कारवाईबद्दल बोलत होतो; फवाद चौधरींची सारवासारव

Fawad Chaudhary

इस्लामाबाद : पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी संसदेत; भारताच्या सुरक्षा जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात होता, असे कबूल केले होते. मात्र यानंतर जागतिक स्तरावर कोंडी झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली – मी पुलवामा हल्ल्याबद्दल नाही, तर त्यानंतरच्या कारवाईबद्दल बोलत होतो.

चौधरी म्हणाले होते – ‘आम्ही भारताला घरात घुसून मारलं. पुलवामामध्ये आपल्याला मोठं यश मिळालं. पाकिस्तानचं हे यश इम्रान खान यांच्या नेतृत्वात देशाला मिळालं. तुम्ही आणि आम्ही सर्वजण या यशाचे भागीदार आहोत.’

यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाली होती. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही. के. सिंह यांनी हा मुद्दा जागतिक स्तरावर उचलण्याची आणि FATF मधून पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तान मुस्लीम लीग-एनचे (PML-N) नेते अयाज सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले तेव्हा एका बैठकीत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांचे पाय थरथरत होते, असं विधान केलं होतं. यावर फवाद चौधरी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये उत्तर दिले.

फवाद चौधरी म्हणाले, ‘सादिक म्हणतात कुरेशी यांच्या पायांचा थरकाप होत होता, मात्र मी म्हणेल की पाकिस्तानने भारताला घरात घूसून मारलं. पुलवामात इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानला मोठं यश मिळालं. त्याचे आपण सर्व भागीदार आहोत.’

यामुळे पाकिस्तान अडचणीत आला. आता चौधरी म्हणतात – ‘माझं वक्तव्य अगदी स्पष्ट होतं. मी पाकिस्तानच्या ऑपरेशन स्विफ्ट रिसोर्टविषयी बोलत होतो. पाकिस्तानचं हे ऑपरेशन भारताच्या बालाकोट एअरस्ट्राईकनंतर केले होतं. यात पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय हवाई दलाचे विमान पाडले होते. पायलट अभिनंदन वर्धमान यांना पकडलं होतं. मात्र, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी पुलवामा हल्ल्याबद्दल नाही, त्यानंतरच्या कारवाईबद्दल बोलत होतो.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER