पुलवामा हल्ल्यातील आरोपीला जामीन : दु:खद घटनेचा उपयोग राजकारणासाठी -अहमद पटेल

Ahmed Patel

नवी दिल्ली :- पुलवामा हल्ल्याप्रकरणातील आरोपी युसुफ चोपान याला दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालयाने जामीन दिला आहे. काही मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार युसुफ चोपान याला पुलवामा हल्ल्याप्रकरणी कधीही अटक करण्यात आलीच नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक; राष्ट्रवादी देणार शिवसेनेला धक्का?

दरम्यान पुलवामा हल्ल्यातील आरोपीला जामीन मिळाल्याचे ऐकून आपल्याला धक्काच बसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) इतकी व्यस्त होती की ती आरोपपत्रच दाखल करू शकली नाही. हा आमच्या शहीद सैनिकांचा अपमान आहे. हे स्पष्टच आहे की या दु:खद घटनेचा उपयोग सरकारने राजकारणासाठी केला गेला आणि न्याय देण्याबाबत कुठल्याही प्रकारची गंभीरता दिसून आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.