जगभरातील डाळ व्यापारी लोणावळ्यात; आंतरराष्ट्रीय परिषद प्रारंभ

Pulses traders across globe assembles in Lonavala

पुणे :- पाचवी आंतरराष्ट्रीय डाळ परिषद लोणावळा येथे सुरू झाली आहे. उद्या शुक्रवारी १४ फेब्रुवारीला समारोप होणार आहे.

इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने या परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कॅनडाच्या प्रांतातील कृषिमंत्री डेव्हिड मारिट या परिषदेस मार्गदर्शन करणार आहेत.

डाळ उद्योगाची वर्तमान स्थिती, कडधान्य उत्पादन आणि तंत्रज्ञान या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. म्यानमार, रशिया, युक्रेन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इथियोपिया, युगांडा, टांझानिया, मोझांबिक आदी कडधान्य निर्यातदार देशांतील सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.