डाळी महागल्या : सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Pulses become more expensive

मुंबई :तूर, सोयाबीन, कापूस, शेंगदाणा, उडीद या पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. आठवड्यात डाळींचे दर सरासरी १० रुपयांनी वाढले आहेत. पुढील काही महिन्यांत  वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाच आता ऐन सणांच्या तोंडावर महागाईनं डोकं वर काढलं  आहे. धान्य आणि कडधान्याच्या दरात या आठवड्यात वाढ झाली असून तूरडाळीने आठवड्यात शंभरी पार केली आहे. सूर्यफूल  तेलाच्या दरात किलोमागे १० ते १२ रुपयांची वाढ झाली तर हरभराडाळ, उडीदडाळ, मूगडाळ आणि मसूरडाळीच्या दरातही किलोमागे सरासरी १० रुपयांची वाढ झाली आहे. कडधान्य आणि तेलाच्या दरात वाढ झाल्याने महागाईचे चटके जाणवू लागले आहेत.

ठवड्यात तूरडाळीच्या ९२ रुपये प्रतिकिलोवरून १०५ रुपयांवर गेला आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये तूरडाळीचे बंपर उत्पादन झाल्यावर दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळीचे पीक घेण्याकडे पाठ फिरवली. २०१८ मध्ये दुष्काळ व कमी पावसामुळे तूरडाळीचे उत्पादन घटले आहे. त्यानंतर तूरडाळीचा  २२५ रुपये किलोपर्यंत दर गेला होता. त्यानंतर मागील वर्षभरात सरासरी ९० रुपयांच्या आसपास असणाऱ्या तूरडाळीने आता आठवड्यात शंभरी पार केली आहे. सूर्यफूल, शेंगतेल, सरकी आदी खाद्यतेलांच्या दरातही सरासरी १० रुपयांची किलोमागे वाढ झाली आहे. गहू, तांदूळ, शेंगदाणे आदी किराण्याचे दर स्थिर असल्याचे होलसेल व्यापारी सांगतात.

डाळींचे वाढलेले दर असे
तूरडाळ (Turdal) ९२ रुपये प्रतिकिलोवरून १०५ रुपये  झाली. हरभराडाळ ६० रुपयांवरून  ७० रुपये  झाली. उडीदडाळ ८८  रुपये   किलो होती ती आता १०५  रुपये   झाली. मूगडाळ ८८ रुपयात १० रुपयांची वाढ झाली. मसूरडाळ ६२ रुपये किलोवरून ६८ रुपये किलो झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER