
आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये परदेशी खेळाडूंची धमाल आहे.ख्रिस मॉरिसने (Chris Morris) 16 कोटींचा टप्पा (16.25 कोटी). ओलांडल्यावर न्यूझीलंडच्या काईल जेमीसनसाठी (Kyle Jamieson) राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने (RCB) तब्बल 15 कोटी मोजले आहेत. ग्लेन मॕक्सवेल (Glenn Maxwell) व झे रिचर्डसन (Jhye Richardson) यांनी 14 कोटींच्यावर किंमत मिळवली आहे. रिली मेरेडीथसारख्या (Riley Meredith) नवख्या खेळाडूला 8 कोटी मिळाले.
काईल जेमीसन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक किंमत मिळवणारा न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे. याआधी ट्रेंट बोल्टला 2017 मध्ये 5 कोटी रुपये मिळाले होते.
दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तब्बल सात वर्षानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पुन्हा आयपीएलमध्ये खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला बेस प्राईस 50 लाखांवरच आपल्या संघात घेतले.पूजारा यापूर्वी 2014 मध्ये आयपीएल खेळला होता. त्यावेळी तो पंजाबच्या संघात होता. 2019 पासून पुजारा टी-20 क्रिकेट खेळलेला नाही.
सर्वात महागडा खेळाडू ठरलेला दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ख्रिस मॉरिससाठी चार संघ स्पर्धेत होते. त्यात शेवटी 16.25 कोटीची बोली लावून राजस्थान राॕयल्सने राॕयल चॕलेंजर्सवर बाजी मारली. मुंबई इंडियन्स व पंजाब किंगनेही स्पर्धा केल्याने त्याची किंमत वाढली. त्यानंतर राॕयल चॕलेंजर्सने काईल जेमीसनसाठी 15 कोटी मोजले.
माॕरिस हा याच्याआधी 2015 च्या सिझनमध्ये राजस्थान राॕयल्ससाठी खेळला होता. त्यावर्षी त्याने सर्वाधिक 13 विकेट काढल्या होत्या.
माॕरिसला मिळालेली 16.25 कोटींची रक्कम ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक आहे. त्याने कुणाकुणाला मागे टाकले…
युवराजसिंग – 16 कोटी- 2015
पॕट कमिन्स – 15.5 कोटी – 2020
बेन स्टोक्स – 14.5 कोटी – 2017
आॕस्ट्रेलियन अनकॕपड् खेळाडू रिली मेरेडीथ यांच्यासाठी पंजाबने तब्बल 8 कोटी मोजले.
ग्लेन मॕक्सवेलने बेस प्राईस दोन कोटी ठेवली होती. त्याच्यासाठी राॕयल चॕलेंजर्सशिवाय राॕयल्स, सीएसके, केकेआर यांच्यात स्पर्धा होती. काईल जेमीसनसाठी बंगलोरने पंजाबला टक्कर देत डील पक्की केली.
झै रिचर्डसनसाठी पंजाब, दिल्ली व बंगलोर यांच्यात चुरस बघायला मिळाली. मेरेडीथसाठीही दिल्लीने पंजाबला स्पर्धा दिली.
कूणाकडे कोण?
चेन्नई – के गौतम (9.25 कोटी), मोईन अली (7 कोटी), पुजारा (50 लाख)
दिल्ली – टॉम करन (5.25 कोटी), स्टिव्ह स्मिथ (2.20 कोटी), उमेश यादव (1 कोटी), रिपल पटेल (20 लाख), विष्णू विनोद (20 लाख), लुकमान मेरीवाला (20 लाख), एम.सिध्दार्थ (20 लाख)
कोलकाता – शकिब अल हसन (3.20 कोटी), शेल्डन जॕक्सन (20 लाख)
मुंबई – नेथन कोल्टरनाईल (5 कोटी), अ़डम मिल्ने,(3.20 कोटी) पियुष चावला (2.4 कोटी)
पंजाब – झे रिचर्डसन (14 कोटी), रिली मेरेडीथ (8 कोटी), शाहरुख खान (5.25 कोटी), मोझेस हेन्रीक्स (4.2 कोटी), डेविड मालन (1.5 कोटी)
राजस्थान – ख्रिस माॕरिस (16.25 कोटी) शिवम दुबे (4.4 कोटी) चेतन सकारीया (1.2 कोटी) मुस्तफिझूर (1 कोटी) केसी करिअप्पा (20 लाख)
बंगलोर – काईल जेमिसन (15 कोटी) ग्लेन मॕक्सवेल (14.25 कोटी) सचिन बेबी (20 लाख) रजत पाटीदारा (20 लाख) मोहम्मद अझाहरूद्दीन (20 लाख)
हैदराबाद – जे सुचिथ (30 लाख)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला