
मुंबई :- टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या (Puja Chavan Case) मृत्यूनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच, राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षाकडून या प्रकरणात शिवसेना नेते वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राठोड यांनीही या प्रकरणी अद्याप मौन बाळगल्याने त्यांच्यावरील संशय अधिकच बळावला आहे. त्यातच आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्या दुस-या पत्नी करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांनी उडी घेतली आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी पूजा चव्हाणला न्याय मिळावा, अशी मागणी सोशल मीडियावर केली आहे. यात त्यांनी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचा उल्लेख केला. त्यांनी या संस्थेच्या
महाराष्ट्र महिला अध्यक्षा म्हणून स्वत:चा उल्लेख केला आहे. पूजाला त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली आहे.
करुणा यांनी म्हटले आहे की, जे दिशाबरोबर झाले आहे, तेच पूजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही. आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे.
दरम्यान, पूजाने आत्महत्या केली नाही, असा दावा तिच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, पूजाने आत्महत्या केली नाही. पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झाला आहे. असे पुजाच्या आजीने म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला