मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचे प्रकाशन

CM Uddhav Thackeray

आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’च्या आषाढी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.

कोरोनाच्या काळातही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रिंगण प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान दरवर्षी एका संताचा पत्रकारितेच्या नजरेनं शोध घेणं हे रिंगणच्या अंकाचं वैशिष्ट्य असून, यंदा संत सोपानदेव यांचा शोध त्यातून घेण्यात आला आहे. रिंगणचे आजवर संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी या संतांवर अंक प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER