शिर्डी साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे कोरोनाने निधन

Public Relations Officer of Shirdi Sai Sansthan Mr Mohan Yadav passed away due to COVID 19

शिर्डी: साईबाबा संस्थानचे (Shirdi Sai Sansthan) जनसंपर्क अधिकारी मोहन यादव ( Mohan Yadav ) यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन ( passed away ) झाले आहे.

यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  काल त्यांची तब्येत ढासळल्यानंतर त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या १६ वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के.  व्ही.  रमणी यांनी संस्थानला ११० कोटींच्या  देणगीतून साईआश्रम इमारत बांधून दिली.

त्यातील काही इमारतीत आज कोविड हॉस्पिटल सुरू आहे. यादव हे एक अतिशय मदतनीस आणि मवाळ भाष्य करणारे. त्यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या. यादव यांनी लिहिलेल्या ‘श्री साईचरित्र दर्शन’ या पुस्तकाचा जवळपास १२ भाषांत अनुवाद झालेला आहे. त्यांनी लाखो लोकांना दर्शनासाठीही मदत केली आहे. यादव यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER