पैसा जनतेचा, मग लसीचे क्रेडिट मोदींना का? बॅनर्जींचा सवाल

PM Narendra Modi - Mamata Banerjee

पश्चिम बंगाल :- २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना (Corona) प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. कोरोना लस मोफत दिल्याचे क्रेडिट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) का घेतायत? नागरिकांना मोफत लस मिळावी, हा त्यांचा अधिकार आहे. कारण यासाठी लागणारा पैसा जनतेच्या खिशातून आलेला आहे. भाजपने (BJP) खर्च केलेला नाही. यावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आक्षेप घेतला आहे.

“नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, यासाठी आधीच पंतप्रधानांना पत्र लिहून कळवण्यात आले होते. हा निर्णय त्यांनी आधीच घ्यायला हवा होता. यासाठी मोदींनी चार महिने लावले. तेही राज्यांनी खूप दबाव टाकल्यानंतर. आता तरी मोदी प्रचाराऐवजी लसीकरणावर अधिक लक्ष देतील, अशी आशा आहे.” अशी टीका बॅनर्जींनी केली आहे.

केंद्र प्रत्येक क्षेत्रात अपयशी आहे. त्यामुळे मोफत लसीकरणाचे क्रेडिट पंतप्रधानांनी तर घेऊच नये. बिहार निवडणुकीआधी भाजपने मोफत कोरोना लसीकरणाचे स्वप्न दाखवले, त्याचे काय झाले? असा सवाल करत कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणावर केंद्र अजूनही GST घेत आहे. कोरोनासाठी केंद्राकडे नेमकी पॉलिसी तरी काय, याची कोणालाही कल्पना नाही, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, “पश्चिम बंगालमध्ये आम्ही आतापर्यंत २० लाख लोकांचे लसीकरण केले. पण आम्हाला मोदींच्या भाषणाशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. त्यामुळे मोदींना हटवा हीच आमची मागणी आहे.”

ही बातमी पण वाचा : मोदींमुळेच भाजपाला सात वर्षांपासून मिळते आहे यश; संजय राऊतांनी केले जाहीर कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button