लोकांना ‘नरेंद्र मोदींना’ पर्याय हवा आहे… – शरद पवार

pm modi-sharad pawar

नवी दिल्ली :– राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रिय नेतृत्त्व पदावरून मोठे विधान केले आहे. पंतप्रधान मोदींबद्दल जनतेच्या मनात काय भावना आहेत. लोकांचा मूड काय आहे. याविषयी त्यांनी मत मांडले आहे.

देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. लोकांच्या नोकरीवर गदा येत आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री स्वतः अर्थमंत्री महागाईवर बोलताना बाळबोध विधानं करत आहेत. तरिही ज्या तीव्रतेने लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजे ती आक्रमकता लेक दाखवू शकत नाहीत.

“केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही? त्याची तुलना का करत नाही?,” असा प्रश्न उपस्थित शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे,” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेनं निवडणुकपुर्व युती तोडून विरोधी पक्षांच्या सहाय्याने तीन पक्षांचे सरकार राज्यात स्थापन केले. तीन पक्षांचा मिलाप घडवून आणून ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची गादी मिळवून देण्यात शरद पवार यांची मुख्य भूमिका होती. विरूद्ध विचारसरणीच्या तीन पक्षांना एकत्र आणून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आणले. राज्यात महाविकास आघाडीच गणित जुळवून आणत शरद पवार यांनी नवा राजकीय प्रयोग केला.

ही बातमी पण वाचा : एकत्र काम करण्यासाठी तडजोड करावीच लागते-  शरद पवार 

याच दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आपल्याला ऑफर दिल्याचा गौप्य स्फोटही त्यांनी केला होता. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजपच्या केंद्रिय नेतृत्त्वाबद्दल जनभावना काय आहेत यावर भाष्य केले.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या टीकासुद्धा करतो.

पण, भाजपने लोकहिताला मारक ठरेल असे निर्णय घेतले आहेत. तरिही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. मात्र, त्य़ांना आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का?,”असा प्रश्न यावेळी पवारांनी केला.

पवार म्हणाले, “मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की ‘अ’ (मोदी) हा चुकीचा आहे आणि ‘अ’ (मोदी) ला ‘ब’ उत्तर देऊ शकतो. यापुर्वी मी असा प्रयोग केला आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबाही मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात,” असं पवार यांनी यावेळी सांगितले. पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा? याप्रश्नावर त्यांनी हे मत व्यक्त केलं.