नागपुरात आज आणि उद्या जनता कर्फ्यू

Janta curfew-Nagpur

नागपूर : कोरोना (Corona) संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या काही दिवसांत नागपुरात कडक लॉकडाऊन की संचारबंदी यावर चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यात भाजप, कॉंग्रेससह मनपा, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर संयुक्तपणे जाहीर झालेल्या निवेदनात जनता कर्फ्यूचा ( Janta curfew-Nagpur) निर्णय जाहीर करण्यात आला.

आज शनिवार व उद्या रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर २७ ते ३० जुलैपर्यंत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शहरभर फिरून नियम पाळण्यासाठी जनजागृती करतील. ३१ जुलैला दुपारी पुन्हा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर शहराच्या भल्यासाठी आवश्यक तो पुढील निर्णय घेण्यात येईल.

आज उद्या काय बंद काय सुरू –

बंद –

  • कपड्यांची दुकाने
  • मोबाईल शॉपी
  • इलेक्ट्रीक दुकाने
  • हार्डवेअरची दुकाने

सुरू –

  • मेडीकल स्टोअर्स
  • भाजीपाला दुकाने
  • दूधविक्री
  • किराणा दुकाने