फ्लॅशमॉबच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे :- रविवारची सायंकाळ..,ठाण्यातील विवियाना मॉल हा गर्दीने फुलूनगेलेला.. या सर्व गर्दीत अचानक मध्ये गाणेवाजते या गाण्यावर मुले नृत्य करतात.. आणिहे सर्व पाहण्यासाठी तळमजल्यापासून तेअगदी तिसऱया मजल्यापर्यत नागरिकांची गर्दीजमलेली… निमित्त होते निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ठाण्यात झालेल्या फ्लॉशमॉबचे.

सध्या सर्वत्र निवडणुकीसंदर्भात मतदानजनजागृतीचे काम सुरू आहे. मॉलमध्ये होतअसलेले नागरिकांची गर्दी लक्षात घेवून ठाणेलोकसभा मतदारसंघातंर्गत 146 विधानसभामतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूकअधिकारी तसेच वर्तकनगर प्रभागसमितीच्यासहाय्यक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनीया कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ही बातमी पण वाचा : ठाणे जिल्ह्यात 5 महिला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

जास्तीत जास्त नागरिकांनी 29 एप्रिलरोजी होत असलेल्या मतदानादिवशीमतदानप्रक्रियेत सहभागी होवून आपले राष्ट्रीयकर्तव्य बजावावे यासाठी या आगळा वेगळाफ्लॉशमॉब उपक्रम राबविण्यात आला होता.या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमिळाला. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक गर्दीतएखाद्या गाण्यांवर ग्रुपच्या माध्यमातून नृत्यसादर केले जाते या माध्यमातून नागरिकांचेलक्ष वेधून घेवून त्यांना मतदानाचे महत्व सांगूनमतदान करणेबाबत आवाहन केले जाते. हाउपक्रम ठाण्यात प्रथमच राबविण्यात येतआहे. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असेलत्या ठिकाणी सध्या हा उपक्रम विविधठिकाणी घेतला जात आहे. विवियानामॉलमध्ये रविवारी (14 एप्रिल, 2019) रोजी प्लॅशमॉब घेण्यात आला.