PUBG गेमसह 118 अँपवर भारतात बंदी

PUBG Banned

दिल्ली : भारत सरकारने 118 मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. त्यात पबजी गेमचाही समावेश आहे. पबजी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अँप्सवर भारताच्या इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या संरक्षण आणि सार्वभौमतेला धोका असल्याचे सांगत केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे.

यात सध्या मोठ्या संख्येने खेळला जाणारा पबजी गेम, तसंच वीचॅट वर्क, वीचॅट रिडींग, लिविक, लुडो वर्ल्ड आणि मोबाईलमधील फोटो लपवण्यासाठी वापरले जाणारे गॅलरी वॉल्ट, गॅलरी लॉक या अॅप्सचा समावेश आहे. PUBG गेम बंद करा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने पालक करत होते.

यासाठी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. बुधवारी (2 सप्टेंबर) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून संबधित अॅप्सवर कारवाई करत असल्याची घोषणा केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER