अशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणाऱ्यांची मानसिकता

Is-Flirting-Cheating-When-You’re-in-a-Relationship

एखाद्याचे आपल्यावर जीवापाड असलेले असलेले प्रेम जितके मनाला तृप्त करणारे असते तितकेच नात्यात विश्वासघात झाल्यास मनाला होणाऱ्या वेदना या असाह्य असतात. अनपेक्षित पणे झालेला हा धोका मनात खोलवर जखमा करतो. अश्यात आपण माणूस ओळखायला चुकलो ही अपराधी भावना आयुष्यभर मनात घर करते ते वेगळेच. काही गोष्टींचा वास्तविकपणे विचार केल्यास हा धोका टाळता येणे शक्य आहे.

cheater in relationship एका ऑनलाईन सर्वेनुसार पाच पैकी एक व्यक्ती ही नात्यात विश्वासघात करणारी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार ज्याला फसवणूक करण्याची सवय आहे तो व्यक्ती कायमच तसा असतो, म्हणजेच तो आपल्या वागण्यात कधीच सुधारणा करत नाही. जे लोक एकदा धोका देतात, त्यांचे धोका देण्याचे आणखी कमीत – कमी तीन चान्स असतात. कारण एकदा धोका देणारी व्यक्ती त्या गोष्टीला समायोजित करणे  म्हणजेच जस्टिफाय करणे शिकलेली असते. त्यामुळे धोका देणे त्या व्यक्तीसाठी सोप आणि सहज शक्य होते.

ही बातमी पण वाचा : चार चौघात असतानाही ‘ती’ होईल तुमच्याकडे आकर्षित

सोशल, सायकॉलॉजी अँड पर्सनॅलिटी सायन्यच्या रिसर्चनुसार, पॉर्न बघणाऱ्या पुरुषांमध्ये धोका देण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. धोका देण्यामध्ये वय देखील जबाबदार असते. ऑनलाइड डेटिंग साइटच्या संशोधनानुसार, महिलांचे दगा देण्याचे सरासरी वय ३६ वर्ष असते. रिसर्चनुसार ३० वय असलेल्या व्यक्तींमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक असते.

यासाठी त्या व्यक्तीचे जीन्स जबाबदार असल्याचे तज्ञांचे मत आहे.  या रिसर्चनुसार दगा देणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिनचे रिसेप्टर कमी असतात. जे सेक्सनंतर बॉन्डिंगसाठी जबाबदार असतात. यामुळे लोक कोणतीही अटॅचमेंट नसतानाही कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू शकतात.

ही बातमी पण वाचा : म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..