मनाच्या श्लोकातील मानसशास्त्र

Psychology in the verses of the mind

श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हा काव्यग्रंथ व विस्ताराने लहान असला ,तरी उत्कट भक्ती योग आणि सहज अध्यात्म योग या दोन्ही उपयोजनांची सांगड घालणारा महान ग्रंथ आहेच. पण त्याचबरोबर मानवी शरीर यंत्राला प्रेरणा देणाऱ्या व कार्यरत ठेवणाऱ्या आणि अतिसूक्ष्म तरल अशा मनालाच समर्थांनी आवाहन केले आहे. मानवी मनचं व्यक्ती ,समाज व राष्ट्र यांचा विकास करते.

व हेच मन भयंकर अध:पातालाही कारणीभूत ठरते .वेळोवेळी भारताच्या इतिहासाचे अत्यंत काळ कुट्ट मनुष्याला लाजवणारे प्रसंग घडले त्याला कारण त्या त्या काळात ज्यांच्या हातात देशाची सूत्रे होती त्यांची अवस्था होती .तीर्थयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण देशाचा प्रवास करीत असताना आपल्या समाजाचे हे लाचार ,अवनत स्वरूप पाहून समर्थ फार व्यथित झाले. हजारो वर्षांच्या तेजस्वी व पुरुष संपन्न इतिहासाशी नाते सांगणारा हा समाज आज परकीय सिंहासने सजविण्यात धन्यता मानतो असे का असा त्यांना प्रश्न पडला. पण यांची मने मेली आहे, आत्म चेतना नष्ट झाली आहे, दुर्बल व हताश मन आपण काही करू शकू हा विश्वास गमावून बसते. हेच ह्या दैन्यावस्थेला कारण आहे.

यातून हा देश व समाज मुक्त करायचा असेल ,तर हे समाजमन तेजस्वी ,पराक्रमी आणि कर्तव्य भिमुख करावे लागेल. मन हेच प्रमुख आहे, ते पापी ही होते ,व पराक्रमी होते. असा विचार करून श्री समर्थांनी मनाचे श्लोक हे काव्य रचले. “समर्थाचिया सेवका वक्र पाहे “अशी कोणीही नसल्याची ग्वाही दिली दुर्बल आणि हताश व असहाय्य समाजाला कार्यप्रवण करण्यासाठी एक ध्येयवाद, त्यानुसार काढावयाची उद्दिष्टे, ती सफल करण्यासाठी एक सर्वसाधारण कार्यपद्धती आणि संपूर्ण चळवळीच्या पाठीमागे भक्कम श्रद्धा निर्माण करण्यासाठी म्हणून भगवत शक्तीचे अधिष्ठान दिले. यातून श्रीसमर्थांनी समाजाचे केलेले हे मानसशास्त्रीय निदान व स्वतःच्या अलौकिक प्रतिभेतून त्यावर केलेले अभिनव व उपचार हे समर्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण कार्याचे खरे द्योतक आहे.

लोकमान्य टिळक आणि त्यांचे मित्र यावेळी समाज मन दुर्बल झाल्याची जाणीव होऊन, ते सफल करण्यासाठी भाषणे, वर्तमानपत्रे ,लेख यातून प्रयत्न करत होते त्यावेळी नीरनिराळ्या शहरात, चौ रस्त्यांवर व प्रमुख ठिकाणी पहाटेच्या वेळी तरुण मंडळींनी घड्याळ आवाजात मनाचे श्लोक म्हणून अक्षरशः लोकजागृती केली .ऐकूनच कित्तेक निद्रीस्त तरुण जागे होत हळूहळू आखाड्याचा मार्ग धरू लागले .साधे शब्द लयबद्धता आणि घेता यामुळे या श्लोकांचे सौंदर्य खूपच वाढले आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या मनाला उद्देशून हे श्लोक लिहिलेले आहेत, म्हणजेच याच्यातील भाषा ही प्रथमपुरुषी एकवचनी असून त्यात कुणाला उपदेश केला नाही की सूचना दिलेल्या नाहीत .त्यामुळे ते वाचकांना जास्त भावतात. आणि आपोआप हवी ती शिकवण त्यातून उचलली जाते. म्हणजेच ती एक प्रतीकात्मक गोष्ट होते .त्यानिमित्ताने त्यांनी सगळ्या समाजातील प्रत्येक मनाला आत्म साक्षी होण्याची प्रेरणा दिलेली आहे. आत्मचिंतनाची प्रेरणा दिलेली आहे .त्यांनी जर द्वितीय पुरुष वापरून तुमचे मन अमुक रितीने वाईटाकडे वळते. ते चांगल्याकडे वळवा. अशा थाटात उपदेश मनाच्या श्लोकात केला असता तर ,तो वाचणाऱ्यांना आणि ऐकणार्यांना तितकासा रुचला नसता. उलट श्री रामदासांनी आपला स्वतःवरचा अपुरेपणा चा आरोप करून सुधारण्याच्या पायऱ्या कोणत्या हे मनाच्या श्लोकात सांगितले. त्यामुळे प्रत्येकाला आपापले मन तपासून पाहण्याची दृष्टी आली. एवढा मोठा माणूस स्वतःच्या मनाचा कमकुवतपणा अशा तऱ्हेने घालवतो असे चित्र दिसल्याने सामान्याला स्वहित करण्याची प्रेरणा मिळाली मानसशास्त्राच्या दृष्टीने हे एक परीशिक्षणाची आणि हळुवार आणि उत्कृष्ट पद्धत आहे.”येथ बोल ना ही जनासी lहे अवघे आपणास पासी l सीकवावे आपल्या मनाशी l क्षण क्षणा l”

मनाच्या श्लोकांचा मानसशास्त्रशी संबंध हा असा आहे. मानसशास्त्राचे काम मन जाणण्याचे असते. मन वळविण्याचे असते. मनाला शिकवण्याची साधने (टूल्स/थेरपीज) निर्माण करण्याचे असते. ही सगळी कामे मनाचे श्लोक अगदी सरळ आणि सुबक पणाने करतात. मनाच्या श्लोकाचा आणि मानसशास्त्राचा हा असा तर संबंध आहे ,पण मंत्राचा संबंध तितकाच दृढ आहे.

त्या साठीच्या तीन पायऱ्या

  • श्लोक हे मंत्र कारण मंत्राचे काम मन त्राण (मन बदलावे)
  •  मन बदल कशाने ? वाचन चिंतन वर्तनाने.
  • बदलाचा उद्देश आणि स्वरूप काय ? तर चंचल, व चंचल करणे.

या तीनही पायऱ्या मनाच्या श्लोकातून हे साध्य करतात.

मन आणि परोपकार यांचा संबंध श्री रामदासांच्या मनात तर दृढ आहेच .साधना करणार यांच्याही मनात असावा असा त्यांचा आग्रह आहे ,म्हणूनच मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकात दुसऱ्याला मदत करण्याची सूचना ऐकलेली आहे जसे की ती ‘ सत ‘या शब्दाने किंवा ‘संत संगती ‘च्या निमित्ताने किंवा’ सत जना’त्यानिमित्ताने असो.

या अफाट विश्वातील प्रत्येक अनुरेणू आतील विरोधाने भरलेला आहे .परस्पर विरोधाने भरलेला आहे. माणसाला एकटा ठेवला तर तो स्वतःशीच भांडत बसेल. सकाळीच असे एक मत असेल संध्याकाळी त्याचे दुसरे मत असेल. मनात मनातील संघर्षाला उच्च अध्यात्मिक स्तरावर नेण्याासाठी श्री समर्थ रामदासांनी मन आणि ब्रम्ह यांचा संबंध दाखवलेला आहे .आणि ब्रम्ह अतिविशाल आहे तरीही मनाची ताकद तसे होण्याची असते. मानवतावादी शास्त्राप्रमाणेही प्रत्येक व्यक्तीमध्ये ही असते. याची जाण समर्थांना असल्याचे जाणवते म्हणूनच ते प्रत्येक मन शुद्ध झाले म्हणजे ते आत्मरुप होते आणि म्हणून विशाल होते असे दाखवून देतात. मन शुद्धीचा झगडा सूक्ष्म रुपात राहतो. प्रत्येक मनाला साद घालत ते मन शुद्धीचे प्रयत्न करतात. कारण प्रत्येक मनुष्य हा आपली प्रगती साधण्यासाठी शक्तीसंपूर्ण असा आहे, हे पूर्ण सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे याची त्यांना खात्री आहे.

त्याचप्रमाणे मना सज्जना ,नको रे मना, याप्रकारे ते स्वतःच्या मनाशी संवाद साधताना दिसतात. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी त्यांनी” मन संवादा “ला महत्व दिलेले दिसते. फ्रेंड्स ! आपणही आपल्या “मन संवाद “या स्तंभातून याच प्रकारे आपल्या मनाशी संवाद साधण्याचे तर काम करत आहोत आहोत .म्हणजेच आपण योग्य रस्त्यावर आहोत. आत्मनिरीक्षण करत मनाशी संवाद साधत जात असताना आपल्याला, मनाच्या श्लोकांच्या अंगानेही विचार करता येतो. मनाचे श्लोक अवघे दोनशे पाच असले तरी आपल्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे असल्याने आचार्य विनोबा भावे यांना मनो – पनिषद, असे म्हणतात तर मनोबोध आणि मनाची शते या नावाने देखील हा ग्रंथ ओळखला जातो .तुम्ही आत्म् निरीक्षणासाठी कधी मनाच्या श्लोकांचा विचार केल्या आहेत काय ?

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER