ठाकरे सरकारच्या फेरबदलांमुळे पोलीस दलात नाराजी; मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवून अधिकारी सुटीवर

मुंबई : सचिन वाझे यांच्या अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकेप्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची वेळ आली आहे. या बदल्यामुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parmbir Singh) आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) माजी प्रमुख संजय पांडे (Sanjay Pandey) यांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते आज होमगार्डच्या मुख्यालयात जाणार नाहीत. ते मोठ्या सुटीवर जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

तर होमगार्डचे माजी डीजी संजय पांडेही प्रचंड नाराज आहेत. संजय पांडे हे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचा कारभार देण्यात आला होता. मात्र, या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून नाराजी व्यक्त करणारा संदेशही पाठवला. त्यानंतर संजय पांडेही तातडीच्या सुटीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
  • रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
  • संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
  • परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER