दिल्लीतील हिंसाचारास काँग्रेस नेत्यांचे चिथावणीखोर भाषण जबाबदार : रामदास आठवले

ramdas athvale Appeals to workers

मुंबई :- काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणे दिल्लीतील हिंसाचारास कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधानभवनातील प्रेस दालनात आठवले बोलत होते. काँग्रेसच्या चिथावणीखोर भाषणामुळेच दिल्लीतील दंगल उसळली असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले म्हणाले. दिल्लीत सत्तेत असलेली आम आदमी पार्टीसुद्धा या दंगलीत सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.

गुप्तचर विभागाचे अंकित शर्मा (26) यांचा मृतदेह उत्तरपूर्व दिल्लीतील त्यांच्या घराच्या नजिकच्या नाल्यात सापडला असून त्यासाठी आपचे नगरसेवक ताहिर हुसैन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपने हुसैन यांना निलंबित केले असून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरूनही त्यांना हाकलण्यात आले आहे. पोलिस त्यांचा तपास करत आहे. काँग्रेस अनेक दिवसांपासून लोकांना चिथावणी देत आहे. सीएएवरून लोकांची दिशाभूल करणे चुकीचे आहे. दिल्ली हिंसाचारात काँग्रेस किंवा आपचा हात असल्यास त्याचीही चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. शेजारी राष्ट्रांत अन्याय होत असलेल्या नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्यासाठी सीएए असल्याचे आठवले म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुस्लिम आरक्षणाला भाजपचा विरोध : देवेंद्र फडणवीस

पाच दिवसांपूर्वी उत्तरपूर्व दिल्लीत सीएएच्या बाजूच्या आणि विरोधात असलेल्या गटात पाच दिवसांपूर्वी सांप्रदायिक दंगली झाल्या. हिंसाचारी जमावाने अनेक घरे, दुकाने आणि वाहने तसेच पेट्रोल पंप पेटवून दिले. स्थानिक रहिवाश्यांवर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान कोरेगावभिमा प्रकरणातील आरोपींविरुद्धचे खटले मागे घेण्यात आल्याबद्दल आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदनही केले. भाजपाच्या काळातच खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती असे आठवले म्हणाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 649 जणांवरील खटले मागे घेतले आहेत. यात 348 खटले कोरेंगाव भीमा प्रकरणातील मागे घेण्यात आले आहे.


Web Title : Provocative speeches of Cong leaders are responsible for Delhi violence : Ramdas Athawale

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)