केंद्र सरकारकडून उत्पादक शेतकऱ्यांसाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद

Sugarcane - PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. साखर दरातील फरकपोटी सुमारे 5 कोटी ऊस उत्पादकांसाठी साडेतीन हजार कोटी देण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखरेचे दर 25 रुपये किलो आहेत. तर देशांतर्गत साखरेचे दर 31 रुपये आहेत यातील फरकाचे प्रतिकिलो सहा रुपये केंद्र सरकार (Central Government) सबसिडी रूपात देणार आहे.

भारतात जवळजवळ पाच कोटी ऊस उत्पादक आहेत. या व्यतिरिक्त साखर कारखान्यात आणि सहाय्यक कामांमध्ये सुमारे पाच लाख कामगार काम करतात. त्यांची उपजीविका साखर उद्योगावर अवलंबून असते. शेतकरी साखर कारखान्यांना आपला ऊस विकतात, सध्या साखर करखान्यापुढे अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न आहे. या समस्येवर उपाय म्हणून सरकार या योजनेची सुविधा देत आहे. केंद्राच्या निर्णयाने अतिरिक्त साखर साठा खाली करणे. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या थकबाकीची भरपाई होईल. सबसिडी ची रक्कम थेट साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या निर्णयाचा फायदा ऊस उत्पादक पाच कोटी शेतकरी आणि त्यांच्या अवलंबितांना होईल . तसेच साखर कारखान्यात काम करणाऱ्या पाच लाख कामगारांना आणि त्यासंबंधित सहाय्यक कामांना त्याचा फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER