मेट्रोसाठी तरतूद : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन

Devendra Fadnavis

मुंबई : नाशिक (Nashik) आणि नागपूरकरांसाठी (Nagpur) अर्थसंकल्पात तरतूद असल्याबद्दल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोन्ही शहरांतील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

आज सादर केलेल्या २०२१ च्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटी आणि नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची घोषणा केली आहे. यासाठी या दोन्ही शहरांतील नागरिकांचे अभिनंदन करताना फडणवीस यांनी नाशिकचा विशेष उल्लेख करताना म्हटले आहे की, नाशिकच्या मेट्रोचे मॉडेल देशाच्या इतर शहरांत लागू करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER