शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्या; चंद्रकांत पाटलांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

Narendra Singh Tomar - Chandrakant Patil

मुंबई : कोरोनामुळे (Corona) आधीच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत मध्यंतरी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या किमती वाढविल्या. यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्राकडे खतांच्या किमती कमी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही केंद्रीय कृषिमंत्र्यांना खताच्या खरेदीसाठी पत्र लिहिले आहे.

‘खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या.’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून केंद्राकडे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत खताच्या किमतीत वाढ केली आहे. यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात

गेल्या सव्वा वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढवली आहे. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली. हे लक्षात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले व योजना सुरू केल्या आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button