कोरोना उपाययोजनांसाठी 91कोटींचा निधी द्या : बाळासाहेब पाटील

Balasaheb patil

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील कोविड (COVID) रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी 91 कोटी 80 लाख निधी मिळावा, अशी मागणी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

साथरोग नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथे जंबो हॉस्पिटलला मान्यता प्राप्त झालेली आहे.परंतु सद्य स्थितीत निधी अभावी हॉस्पिटल उभारणीस विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे 250 खाटांचे ऑक्सिजन बेड्स हॉस्पिटल, अनुषंगिक साधनसामुग्री, मनुष्यबळ इत्यादीसाठी रुपये 3655.32 लक्ष चा निधी उपलब्ध व्हावा, तसेच काशिळ ता.जि. सातारा येथे ट्रामा सेंटरचे 50 आय.सी.यू.बेड्सचे नवीन हॉस्पिटल उभारणे व अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी रुपये 484.93 लक्ष इतका निधी. बाधित व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, वैद्यकीय देखभाल, दुरुस्ती, प्रयोगशाळा चाचणी, व्हेंटिलेटर हवा शुद्धीकरण यंत्र इतर अनुषंगिक साधनसामग्री (प्रशासकीय स्तरावरील) खर्चासाठी 5043.90 लक्ष रुपये इतका निधी आदींसाठी एकूण 91 कोटी 84 लाख रूपये निधी मिळावा, अशी मागणी ना.बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER