विदर्भातील पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या; फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील अनेक गावे यंदा महापुराच्या पाण्याखाली गेलेत. महापुराने हाहाकार केला. पुराचे पाणी ओसरले; मात्र समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विदर्भातील पूरग्रस्तांसाठी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

फडणवीस यांनी आज नागपूर आणि भंडारा या  जिल्ह्यांतील   पूर नुकसानीची पाहणी केली. नागपूर जिल्ह्यातील मौदा, तालुक्यातील झुल्लर, खापा गावाला महापुराचा मोठा फटका बसला आहे. घरांची पडझड झाली, घरात चिखलाचं साम्राज्य आहे. धान्य भिजल्याने लोकांना खायला अन्न नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी या गावांना भेट दिली व नुकसानीची पाहणी केली. कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरात ज्या प्रकारे जीआर बदलून तत्कालीन सरकारने मदत केली, त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना सरकारनं तत्काळ मदत करावी, सर्व्हेच्या आधी काही रोकड मदत करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महापुरामुळे अनेकांना गाव सोडावं लागलं होतं. पाणी ओसरल्यानंतर पुन्हा गावी परतल्यानंतर पडलेली घरं आणि वाहून गेलेला संसार पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. देवेंद्र फडणवीस यांनी गावक-यांच्या समस्या जाणून घेतल्या व ठाकरे  सरकारकडे तत्काळ मदतीची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER