राज्यात २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर! : अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- स्वत:चे घर असावे (Provide Housing), असे प्रत्येकांचे स्वप्न असते. या सोडतीमध्ये ज्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, त्यांनी निराश होऊ नये. पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलेही घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे सांगून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

पुणे येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२, आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी ३ हजार ३१७ व अल्प उत्पन्न घटकांसाठी १ हजार ५६६ असे एकूण ४ हजार ८८३ सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी काढण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.

दरम्यान घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया संगणकीय असून अत्यंत पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button