गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा : हसन मुश्रीफ यांच्या हॉस्पिटल प्रशासनाला सूचना

Hassan Mushrif

कोल्हापूर :- कोरोनाच्या (Corona) संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत. मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचारासंदर्भातील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रुग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो. यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांना सहकार्य करून, त्यांची सेवा करावी, अशा सूचना विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावेळी केल्या.

ही बातमी पण वाचा : मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लिहिले पत्र

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. त्यास दोन मंत्र्यांशिवाय विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन. लहा, धर्मादाय आयुक्त आर.एन. जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे तसेच बॉम्बे, जसलोक, लिलावती, हिरानंदानी, सैफी, बिच कँडी, नानावटी, रहेजा, हिंदुजा, नायर, रिलायन्स, एसआरसीसी, गुरूनानक, मसीना, ग्लोबल, प्रिन्स अली खान, एच. एन. रिलायन्स अशा विविध धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

कोरोना लॉकडाउनच्या काळात अनेक ग्रामीण रुग्णांना शहराकडे उपचारासाठी येता आले नाही. मात्र, अशा रुग्णांचा उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी शहराकडे येण्याचा ओघ वाढू शकतो. ग्रामीण भागातून प्रवास करून आलेल्या गरीब जनतेला अडचणी भासू नयेत किंवा उपचारात उणिवा राहू नये यासाठी समन्वय साधून त्यांना योग्य उपचार देणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

  • नियमाप्रमाणे दहा टक्के रुग्णांना मिळणार अगदी मोफत उपचार…..
  • ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना दिलासा …….
  • मोठ्या हॉस्पिटलमधूनही मिळणार गोरगरिबांना वैद्यकीय सेवा……

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER